अभिजात मराठीचे निवेदन
अभिजात मराठीचे निवेदन
अभिजात दर्जा मिळावा
आपुल्या मराठीस
म्हणून झगडती इतकी वर्ष
सारी मराठी माणसं ||१||
अभिजात दर्जा मिळवण्यासाठी
लागती निकष चार
सर्वगुण संपन्न असे
तरी दर्जा कधी मिळणार? ||२||
असावी भाषा सर्वश्रेष्ठ
नको नक्कल दुसऱ्या भाषेची
प्राचीन असणे आवश्यक
त्याचबरोबर प्रवाही ||३||
एकनाथ ज्ञानोबांनी लिहिले ग्रंथ
वारसा चालविला कुसुमाग्रजांनी
आपुली मराठी असे सर्वश्रेष्ठ
केला पूर्ण पहिला निकष आत्मविश्वासाने ||४||
प्रसार करण्या बौद्ध धर्माचा
होते मराठी भा
षिक
उल्लेख असा बौद्ध धर्मग्रंथात
बावीसशे वर्षा पूर्वीचा पुरावा सांगे आहे भाषा प्राचीन ||५||
डॉक्टरेट संशोधनात सांगती मायकेल व्हिक्झेल
संस्कृत लागते मावशी मराठीची
वैदिक पूर्व बोली भाषा असे आई
सांगे हा पुरावा नाही नक्कल मराठी कोणाची ||६||
बदल होत गेले काळानुरूप
प्राचीन ते कलियुगीन बोलीभाषेत
तरी असे नाते टिकून त्यांचे
पुरावा हा सांगे प्रवाहीपणा बोलीभाषेत ||७||
अभिजात मराठीचे निकष सारे
करते मराठी पूर्ण ते
भारत सरकारला निवेदन एकच
अभिजात भाषेचा दर्जा मिळू दे ||८||