मानवतेचा शिल्पकार
मानवतेचा शिल्पकार
महामानवा होऊन गेलास तू
या जन्मलेल्या भूतलावर,
विचारांचा सार रचलास तू
म्हणून मिळाला बुद्धिला वावर....
बुध्दिला चालना दिलीस तू
या कृतज्ञतेच्या पिढीला,
जगाला ही सांगितलेस तू
बुद्ध हो आमच्यातला.....
माणुस म्हणून जगण्याला
दिशा दाखवली तू बुध्द धर्माला,
जे कोणी केले नाही ते
करून दाखविले तू या जगाला....
जगणं आणि मरण भोगले तू
जगाच्या पाठीवर उभे असताना,
पुस्तकांचा संच ही बनवलास तू
मानवाला बुध्द धर्म हा शिकवताना...
माणसासाठी देह झिजवून गेलास तू
म्हणून माणसात आज देव बनुनी रहीलास,
बौद्ध धर्म हा जनतेला पटवून दिलास तू
म्हणून मानवतेचा शिल्पकार झालास....
