आई
आई
1 min
202
आई जन्म दिलास तू
दाखवली सुंदर नगरी
तुझ्याविना प्रत्येक मुलाची
अधुरी एक कहाणी
हातांचा करूनी पाळणा
अमृता परि पाजुनी पान्हा
दिवस-रात्र एक करूनी
वाढविलास तुझा कान्हा
नुसतीच नाही काळजी माझी
घरातली माणसं ही आपली
सर्वांची मन जिंकता जिंकता
स्वतःच जगणं तू विसरली
इच्छा अपेक्षा तुझ्या साऱ्या
करणार आता पूर्ण मी
राणीसारखं गादीवर बसवून
सेवा तुझी करणार मी
उच्चस्तरीय शिक्षण माझे
केलेस हाल-अपेष्टातून
सुखात तुला बघण्या
तन मन धन मी अर्पिन
