STORYMIRROR

Shital Thombare

Children

3  

Shital Thombare

Children

व्यथा

व्यथा

1 min
229

शाळा आणि फळा आमच्या वर का बरे रुसले??? 

आवडत नाही का त्यांना आम्हां विद्यार्थ्यांचे 

दंगा मस्ती करणे... 

वर्ग बंद करून सध्या भरतेय ऑनलाईन शाळा... 

मला मात्र माझा वर्गच पुन्हा हवा 

गणिताच्या तासाला नाही होतं आता 

पाढ्यांची उजळणी 

विज्ञानाच्या तासाला नाही प्रात्यक्षिकांची मेजवानी... 

वाचनाशिवाय भाषेची गोडी कशी वाढणार?? 

इतिहासातील सनावळीची कोडी कशी सुटणार?? 

मित्रांची संगत, मधल्या सुट्टीतला डब्बा 

पि.टी च्या तासाची जागा कोण घेणार?? 

कितीही अभ्यास केला तरी काहीतरी कमी वाटतं... 

वर्गात शिक्षकांभोवती घोळका करूनच तर आमच्या 

शंकांचं निरसन होतं.... 

म्हणूनच ऑनलाईन शिक्षणात नाही जिवंतपणा 

कुणीतरी स्वप्नात येऊन माझ्या आता एकदाची 

शाळा सुरु झाली म्हणा... 


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

More marathi poem from Shital Thombare

व्यथा

व्यथा

1 min ପଢ଼ନ୍ତୁ

Similar marathi poem from Children