मधमाशी
मधमाशी

1 min

833
मधमाशीला म्हणाली
एक सुंदर लाल परी
सकाळीच उठते अन
का ग तू करते चोरी....
मधमाशीला आला बाई
खूप खूपच बाई राग
परीला म्हणाली थांब
तुझ्या जिभेला देते डाग....
परी धूमम पळाली की
आपल्या छान घरात
तरी देखील मधमाशी
शिरलीच तिच्या घरात...
परी बाहेर पडून आता
सरसर चढली झाडावर
मधमाशीच ती ती पण
तिच्यामागे आली वरवर.,,.
फूल वदले परीच्या कानात
अगं अगं लाल लाल परी
कोणास समजणार नाही
तू लप परी माझ्या घरी.....
मधमाशीने ते गुपचूप ऐकले
तेव्हापासून न ही मधमाशी
दिनभर नुसती फिरते पाहा
विविध रंगी छानशा फुलांपाशी....