Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Children Stories

4  

Shila Ambhure

Children Stories

सुरु झाली शाळा

सुरु झाली शाळा

1 min
24.1K


रुसलेल्या खडूला

बोले बघा फळा रं

संपली सुट्टी आता

सुरु झाली शाळा रं।।धृ।।


मोफत पुस्तके नि

गणवेष घ्यावया

पोषण आहाराचा

गोडभात खावया

सगळ्यांसवे आला

धावतच भोळा रं।।1।।


रूबी ,मीना, सलीम

वेगळी सारी मुले

ज्ञानमंदिरी आली

देवाघरची फुले

नानारंगी फुलांनी

फुललाया मळा रं।।2।।


इंग्रजी शिकू आणि

करू अंकांशी दोस्ती

गाऊ गाणी, कविता

मैदानावर मस्ती

कागदी नाव करू

चिखलाचा गोळा रं।।3।।


शैक्षणिक साहित्य

नि इतर साधने

डिजिटल वर्गात

सोपे झाले शिकणे

राहा रोज हजर

घरी राहणे टाळा रं।।4।।


ना शारीरिक शिक्षा

नाही छडीचा मार

आनंदी शिक्षणाचे

जि प शाळेत सार

मंजुळ वाणी सरांची

बाईंचा गोड गळा रं।।5।।


Rate this content
Log in