Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.
Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.

Rama Khatavkar

Children Stories

4  

Rama Khatavkar

Children Stories

पाऊस आला

पाऊस आला

1 min
318

गडगड वाजे आभाळ आता 

धीरच नाही कसा विजेला 

टपटप टपटप थेंब वाजती,

आला आला पाऊस आला ||१||

मुले पोचली अंगणात मग 

आनंद झाला फुला फुलांना 

प्राणी पक्षी हसून म्हणती 

गाणी गा, अन् नाचा खेळा ||२||

झरझर सरसर पाऊस आला 

ज्याला-त्याला भिजवून गेला 

इथे-तिथे मग देवाजीचा

हात निळा अन् ओला ओला ||३||

धो-धो पाऊस आला 

नदी झऱ्यांना फुलवत गेला 

चिंब चिंब झाली मग धरती 

विसरून गेली व्यथा कथांना ||४||

हळूच मग ते मेघ पांगले,

खेळुन खेळुन तेही दमले.

किरणांची जादू दाखवते 

झगमगत्या इंद्रधनुष्याला ||५||

Rate this content
Log in