STORYMIRROR

K.V BHAGWAT

Children Stories

3  

K.V BHAGWAT

Children Stories

आज आठवले पुन्हा बालपण...

आज आठवले पुन्हा बालपण...

1 min
374

आज पुन्हा बालपण आठवले

त्या एका जुन्या वहीमुळे 

थोडे हसूदेखील आले 

ती जुनी वही उघडल्यावर इकडून तिकडे

वाकडे तिकडे नाचणारे माझे

अक्षर पाहुन हसूदेखील खूप आले...


एका वहीमुळे पुन्हा 

मला बालपणात नेले तेव्हा वाटलेल्या 

चॉकलेटचे कागद अजूनही

तसेच राहिलेत

एकदा तिने दिलेला तो

चॉकलेटचा कागद सापडला अन्

पुन्हा बालपणात हरवून नेलं मला...


बालपण खरंच खूप छान होतं

पाऊस पडू लागला की त्या एका 

डबक्यात आम्ही मित्र एकमेकांचे 

हात धरून त्यातून बाहेर पडून घरी जायचो...

26 जानेवारी आली की खुपच 

गोळ्या जमा करायचो 

भारत माता की जय म्हणून घोषणा देखील

खुपच जोरात द्यायचो...


वहीची पाने खूप आहेत हो 

आठवणी सांगणारे पण लिहायला

वेळ अपुरा पडेल हो

एक आठवण नक्कीच सांगेन,

ज्यांच्या सोबत मी होतो त्यांना 

अजूनही विसरलेलो नाही 

तुला बघतो म्हणनारा मित्र अजूनही मी

हृदयात जपून ठेवलेला आहे...


Rate this content
Log in