STORYMIRROR

K.V BHAGWAT

Others Children

3  

K.V BHAGWAT

Others Children

ते बालपण

ते बालपण

1 min
250

आज पुन्हा बालपण आठवले

त्या एका जुन्या वहीमुळे 

थोडे हसूदेखील आले 

ती जुनी वही उघडल्यावर इकडून तिकडे

वाकडे तिकडे नाचणारे माझे

अक्षर पाहुन हसूदेखील खूप आले...

एका वहीमुळे पुन्हा 

मला बालपणात नेले तेव्हा वाटलेल्या 

चॉकलेटचे कागद अजूनही तसेच राहिलेत

एकदा तिने दिलेला तो

चॉकलेटचा कागद सापडला अन्

पुन्हा बालपणात हरवून नेल मला...

बालपन खरच खुप छान होत

पाऊस पडू लागला की त्या एका 

डपक्यात आम्ही मित्र एकमेकांचे 

हात धरून त्यातून बाहेर पडून घरी जायचो...

26 जानेवारी आली की खूपच 

गोळ्या जमा करायचो 

भारत माते की जय म्हणून घोषणादेखील

खूपच जोरात द्यायचो...

वहीचे पाने खूप आहेत हो 

आठवणी सांगणारे पण लिहायला

वेळ अपुरा पडेल हो

एक आठवण नक्कीच सांगेन,

ज्यांच्या सोबत मी होतो त्यांना 

अजूनही विसरलेलो नाही 

तुला बघतो म्हणणारा मित्र अजूनही मी

हृदयात जपून ठेवलेला आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन