STORYMIRROR

K.V BHAGWAT

Romance Others

1  

K.V BHAGWAT

Romance Others

एक अजनबी परी ती...

एक अजनबी परी ती...

1 min
114

ती खूप छान दिसते

मला आवडणाऱ्या गुलाबालादेखील ती फिकं करून टाकते...

खरंच ती खूप छान दिसते...


त्यासोबतच तिचं हसणंदेखील 

छान असते तिला बघितल्या बघितल्या

प्रेमात पडावंसं मला वाटते...


ती खूप छान दिसते

तेवढंच नाही तर तिचे ते कानावरचे

केस पण खूप नशीबवान वाटतात कारण,

ते कायम त्या कोमल हाताने ती कानावरुन वर करत असते...


ती खरच खूप छान दिसते तिचा चेहरा पण किती परीसारखा दिसतो

त्यात तिच्या काळ्या डोळ्यावरच्या पापण्या

वर खाली होताना खूप चांगल्या वाटतात...


खरंच ती खूप छान दिसते पण

जेव्हा ती घाबरते ना तेव्हा 

तिचे ते कोमल हात हृदयापाशी 

घेऊन एकमेकांना रिंगण करत असतात...


खरंच ती खूप छान फक्त दिसते

नाही तर सगळ्यांना प्रेमाने जवळ करणारी

जणू ती एक अजनबी परी आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance