STORYMIRROR

K.V BHAGWAT

Inspirational Others

3  

K.V BHAGWAT

Inspirational Others

आई माझ सर्वस्व...

आई माझ सर्वस्व...

1 min
1.0K

आई तू मायेचा सागर आहेस 

आई तू प्रेमाची घागर आहेस

कसं सांगू आई तुला

तू तर साक्षात भगवंत आहेस गं...


बाळाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी 

आई आहेस तू स्वतःच्या पोटातली भूक

लपवून मुलाचं पोट भरणारी पहिली 

आई अन्नदाता आहेस तू...


मुलाने चुका केल्यास हात न उचलता

खूप काही समजवून सांगनारी

आणि चुका सुधरवण्याची संधी देणारी

गुरुदेव आहेस तू...


आई सर्वांचे सुख-दुःखात

पाठीशी उभी राहतेस गं तू 

दुर्गा मातेला हात तर अनेक आहेत पण 

आईला हात कमी असले तरी दुर्गा माँ आहे सर्वांची...


आई तू घरचे कामे नाही केलेस ना तरी चालेल

फक्त आमच्या समोर राहिलीस तरी या जगातल्या

33 कोटी देवतांचं दर्शन आम्हाला तू आहेस

म्हणून होतं गं आई....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational