STORYMIRROR

K.V BHAGWAT

Romance Others

3  

K.V BHAGWAT

Romance Others

प्रेमाची साथ...

प्रेमाची साथ...

1 min
635

किती सोपं अन् किती

सुंदर वाटतं जगणं जेव्हा 

गोडवा असतो एकमेकांच्या प्रेमातला

डोक्यावर भार असला तरी 

साथ तुझी हवी मला

या जीवनात चालत राहण्यास

हात हाती पाहिजे प्रिये मज तुझा...


दिव्याप्रमाणे आपण साथ राहावे 

एकाच्या सोबत दुसऱ्याने देखील साथ द्यावे,

तुझ्या सोबत मी

राहीन जळत पण, नाही

सुटणार साथ आपली प्राण असेल

तोपर्यंत गोडवा राहील आपल्या 

प्रेमातल्या सोबतीचा...


आले जरी दुःख तुला तरी 

तू लपवू नकोस 

साथ देईन मी तुला 

दुसऱ्यांसमोर बोलायला घाबरू गप्प

राहू नकोस

मी साथ देईन तुला 

दुसऱ्यांकडे मदत मागू नकोस 

मनातून मला तू हाक तर मार लगेच उभा 

दिसेन पुढ्यात तुझ्या...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance