पाठीराखा...😍🤗भाऊ
पाठीराखा...😍🤗भाऊ


कितीही मोठे संकट आले तरी
घाबरू नकोस मी आहे अस म्हणनारा
आपला मोठा भाऊ असतो...
कधीही मनात लपवलेल
लगेच ओळखतो मग
हसत हसत काय जाल विचारनारा भाऊ असतो...
चुकल की रागवतो
कधी तरी रडवतो पण त्या दिवशी
तो देखील आपल्याला रागवल्यामुळे
जेवलेला नसतो...
आईबाबा पहिले गुरु असतात
त्यानंतर आपल्यावर लक्ष देणारा
आपल्यावर येणारे प्रत्येक दुखांत ढाल
बनून रक्षण करणारा मोठा भाऊ असतो...
कधी आपल्याकडे पैसे नसले तरी
रागात असला तरी
खिशात गपचुप पैसे ठेवनारा
मोठा भाऊ असतो...
असच प्रेम करणारा
सतत मला मायेने जवळ करणारा व
सतत पाठीशी ढाल बनून राहणारा
आपला मोठा भाऊराया असतो...