फुगेवाला
फुगेवाला
फुगेवाला आला आला
लाला फुगेवाला आला
चला रे मुलांनो चला चला
फुगे घेवू छान छान चला चला....
लाल फुगा बघा बदाम जसा
पिवळा फुगा जसा काकडी
पांढरा फुगा तो कापूस जसा
निळ्या फुग्याची मान वाकडी....
सारे फुगे हवेत तरंगती कसे
आभाळाला जावून भिडतात
उंच उंच आकाशात छान छान
खाली वर, वर खाली तरंगतात....
लाल फुगा वर वर गेला पाहा
उंच उंच जाताना फटदिशी फुटला
आवाज झाला धडाडडडडधूम
मुलांचा आरडाओरडा सुरू झाला....
फुगेवाला म्हणाला "मुलांनो शांत बसा,
मी लाला देतो फुगे तुम्हा सर्वांना
देतो घट्ट दोरी बांधून फुग्याला"
धीर आला सर्वच मग या मुलांना....
फुगे घेतले रंगीबेरंगी सर्व मुलांनी
खेळू लागले आणि उडवू लागले
फुगे मस्त लहरू लागले आभाळात
हे पाहून मुलं सारी खेळताना आनंदले....
