भाऊ बहीण
भाऊ बहीण
1 min
243
जसं पानाला दवबिंदूचा भार होत नाही
माझाही दिवस तुझ्याशिवाय जात नाही
कितीही भांडलो जरी, तू अन् मी एक आहे
पानाला मिळालेली दवबिंदूची भेट आहे
पानाचं रूप खूलतं दवबिंदूच्या वसण्याने
माझंही अस्तित्व खुलेल, तुझ्याच असण्याने
सोबतीचा काळ कमी, जास्त आहे दुरावा
तपत्या उन्हात, पानावर दवबिंदूचा गारवा
जसं दवबिंदूंला आधार देते गवताचं पातं
तसंच आधाराचं आपलं दोघांच नातं
