STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others Children

3  

Sanjay Dhangawhal

Others Children

कुठे हरवले बालपण

कुठे हरवले बालपण

1 min
254

भातुकलीचा खेळ आठवला की

आठवते बालपण 

बालपणीच्या गंमतीजमतीने

फुलते किती मनं

आता आठवली आठवण की वाटते किती छान असते बालपण

 

नाही जेवण नाही अभ्यास

ईकडे तिकडे फिरायचे

शाळा बुडवून नुस्तेच चिंचा आवळे तोडून पळायचे

नही कुणाचा धाक

नव्हते कुणाचे दडपण

किती छान असते बालपण


हट्ट असायचा बाबांकडे

आई द्यायची खाऊ

खाऊ लपवताना दादा म्हणायचा

आली आली माऊ

सुटीच्या दिवशी मस्ती मजा 

खेळता खेळता असे भांडण

किती छान असते बालपण


मोटर गाडी खेळणीसाठी बाबां जवळ रडायचे 

नट्टा पट्टा करतांना 

आईचे धपाटे खायचे

तोडफोड पसारा करायला 

नसायचे कुणाचे बंधन

टिकली पावडर लावताना

मस्त हसायचा दर्पण

खरच किती छान असते बालपण


Rate this content
Log in