मुलगी आहे मी
मुलगी आहे मी
1 min
258
मुलगी आहे मी, मुलगी आहे मी
नाही कुठे, नाही कुठे कमी
मला जन्मास येऊ द्या तुम्ही ll
अंतराळात गेले मी
एव्हरेस्ट सर केले मी
नाही कुठे नाही कुठे कमी
मला जन्मास येऊ द्या तुम्ही l
झाशीची राणी मी,
सावित्री अहिल्या मी
संत जना, मुक्ता, वेणा, मिराबाई मी
नाही कुठे नाही कुठे कमी
मला जन्मास येऊ द्या तुम्ही ll
कवयित्रीआहे मी, लेखिकाआहे मी
टॅक्सीट्रॅक्टर मेट्रोचीही चालक मी
नाही कुठे नाही कुठे कमी
जन्मास येऊ द्या तुम्ही ll
माहेर आहे मी, सासर आहे मी
माहेर नि सासरचा दुवा आहे मी
नाही कुठे नाही कुठे कमी
मला जन्माला येऊ द्या तुम्ही ll
राष्ट्राचे भाग्य मी, राष्ट्रअस्मिता मी
राष्ट्राचा प्राण मी, उद्याची माता मी
नाही कुठे नाही कुठे कमी
मला जन्मास येऊ द्या तुम्ही ll