STORYMIRROR

purushottam hingankar

Thriller

2  

purushottam hingankar

Thriller

शेतकरी बाप

शेतकरी बाप

1 min
105

बाप माझा शेतकरी 

नित्य कष्टाची भाकरी

राब राब राबुनिया

चिल्या पिल्याते उद्धरी!!१!!


बाप माझा शेतकरी

 संगे कष्टाची शिदोरी

शिळ्या भाकरीच्या सवे

जगा पोशिंतो श्रीहरी!!२!!


बाप माझा भाग्य माझे

घडवितो निर्विकारी

चुकल्यास तो ताडीतो

निर्हेतूक प्रेम करी!!३!!


बापा नकारे तयाशी 

मारू जिवंत पणात

सेवा मेल्या वरी नको

पंच पक्वान्न ताटात!!४!!


तया अनाथाश्रमात

नका जाऊ देऊ कदा

तुम्हां कळेल त्यावेळी

जेव्हा व्हाल तुम्ही वृद्धा!!५!!


बाप दाखवी दुनिया

जेव्हा नदिसें तोंदेव

बाप तीर्थाचे माहेर 

संतदासा तों सदैव!!६!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Thriller