STORYMIRROR

Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

1 min
305

जगामधे ज्याचा अन्नदाता म्हणून आहे अलौकिक,

जो आपल्या श्रमाने भागवितो नेहमी इतरांची भूक.

श्रमाने अन्नधान्य पिकवतो ही कां त्याची चूक ?,

भटजी, शेटजी व लाटजी करतात मनमानी त्यावर अचूक.

त्याच्या श्रमाची व कार्याची नाही कुनाल किंमत,

म्हणुन कृषि उत्पादनाला नाही मोजत रास्त किंमत.

शेत मालाला रास्त मुल्य देण्याची नाही सरकारची हिम्मत,

असंवेदनशिल सरकार केव्हा,कशी करणार शेताकर्याची किंमत?. 

भारतीय संस्कृति मध्ये अहिंसचे आहे फार महत्व,

तरी शेतकरी कां करतो स्वतः स्वतःची हिंसा.

शेतकरीच्या आत्महत्याची कां शासनाला नाही खंत ?,

निक्कमी शासन व्यवस्था कां करु पाहते त्याचा अंत.

आपल्या हक्कासाठी त्याने पकडला आंदोलनाचा रस्ता,

खलिस्तानी, पाकिस्तानी, आंतकवादी सोबत काय नात.

व्यापारी, कंपनी ठरवतात आपल्या मालाची किंमत,

शेतकरी कां बर या अधिकारापासुन आहे वंचित.

जर राज्यघटने दिले सर्वांना अधिकार समान,

कृषि उत्पादनाला द्या उचित किंमत किमान.

शेतकऱ्याची रास्त मागणीचे सर्वानी करावे समर्थन,

किमान समर्थन मूल्याने मिळेल शेतकऱ्याला जीवनदान. 

हक्काच्या तरतुदीने नक्की थांबेल आत्महत्येचे प्रमाण,

शेतकऱ्याची मदत केल्याने भारतवासियांचा पण वाढेल सम्मान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy