Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swarupa Kulkarni

Inspirational Others

3  

Swarupa Kulkarni

Inspirational Others

शबरीची बोरे

शबरीची बोरे

1 min
304


जय श्रीराम।

सीतेच्या शोधार्थ निघाले प्रभू दक्षिण दिशेसी..

मागे लक्ष्मण पुढे प्रभू चालले अरण्यातूनी...

अरण्यातून त्या चालत असता लागला एक आश्रम....

प्रभू आणि लक्ष्मण गेले पहावयास आश्रम...

त्यांनी पाहिल्या सर्वच वाटा रानफुलांनी शोभल्या..

तेथे दिसली जीर्णजर्जर तपस्विनी वृद्धा ...

तोंडाने घेते राम नाम ती अविरत 

एकांती...

राम हळूच तिजसी बोलती,

हा आलो माते तूला भेटायासी..

पडले शब्द कानी तियेच्या ती आनंदून जाई...

पाहूनी रामप्रभू सावळा समोरी मंत्रमुग्ध ती होई..

अनेक वर्षांची तप:साधना तियेची आज पूर्ण होई...

झुकूनी रामासमोर शबरी अविरत अश्रू गाळी..

तिच्या मुखातून शब्द उमटले धन्य धन्य मी शबरी...

शतजन्मींचे पूण्य तियेचे आज फळासी येई....

तीने बैसवियले रामप्रभूसी आसनावरती आधी..

मग धूतले आनंदाश्रूंनी चरणद्वय ती सावळी...

मग दिधली उष्टी बोरे खावयासी दोघांसी..

हसून राम त्यास पाहूनी म्हणती रानमेवा आणलास तू माई...

बंधू लक्ष्मण किंचीत जाहला क्रोधित ते पाहूनी..

असले कसले प्रेम प्रभूवर दिधली उष्टी फळे सारी...

शबरी सांगे रानफळे ही असती कधी कडू कधी विषारी...

माझ्या रामासी नको असली बोरे म्हणूनी आधी चाखिली...

रामराया अतिप्रेमळ म्हणूनी बघ रानफळे ही चाखी...

बघूनी तिची भक्ती भोळी रामप्रभू प्रसन्न होई....

माग म्हणती माग हवे ते नको संकोचू माई..

त्यावर वदली माता शबरी नको मजला आता काही ..

हवी फक्त मुक्ती या देहासी जागा तव चरणांशी...

ज्याच्यासाठी अवघे जीवन मी काढले आश्रमी...

दे रे रामा मज घनश्यामा मुक्ती ती सुखाची...

राम बोलले तथास्तू माई जा तू मुक्तीधामासी..

धन्य शबरी धन्य भक्ती तियेची जाहली मुक्त अखेरी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational