STORYMIRROR

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Inspirational

3  

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Inspirational

शब्दात गुंतले मन

शब्दात गुंतले मन

1 min
126

शब्दात गुंतले मन माझे

लागला लेखणीचा लळा

एक एक शब्द गुंफता

फुलला कवितेचा मळा


काळजातील प्रत्येक भाव

लेखणीतून मांडला

सुख दुःखाचा प्रत्येक अश्रू

शब्द बनून कागदावर सांडला


शब्द माझे सोबती

शब्दच बनले मोती

शब्दांनी दिली साथ

लिहिल्या कविता किती


गुंतले वेडे मन हे शब्दात

छंद लेखणीचा जडला

कळजातील प्रत्येक शब्द

वाचकांच्या काळजाला भिडला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational