Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sujata Puri

Inspirational

3  

Sujata Puri

Inspirational

शब्दांच्या पलीकडले

शब्दांच्या पलीकडले

1 min
197


मौनात ही असतात शब्द

हृदयापासून ऐकायला हवे.

भाव मनातले अबोल

शब्दावाचून कळायला हवे.


शब्द बोलतात सगळ

भावना असतात मुक्या

 तोलत असताना स्पंदने

सगळ्या भाषा फिक्या.


अनामिक बोली हृदयाची

सगळ्यांनाच कळत नसते.

 शब्दावाचून अडत नाही

नजरही पुरेशी असते.


अंतरातले उमाळे असतात

शब्दांच्या ही पलीकडले

आपण मात्र राहतो

भावनांच्या ही अलीकडे.


हृदयाची भाषा असते

सगळ्या भाषांत न्यारी

कुठली लिपी नसतानाही

मनात ठसते खरी.


प्रेम असते व्याकरण

भावना असते अलंकार

शब्दांची गरज नसते

जेथे माया निरंकार..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational