शब्दांची रांगोळी
शब्दांची रांगोळी
मनाच्या गाभाऱ्यातून
मी रेखाटते भावनांच्या ओळी
ठिपके ठिपके सौख्याचे जोडून साकारते मग शब्दांची रांगोळी
ना कुठला कानोसा, ना कुठला आडोसा,
कल्पनेच्या विश्वाला शब्दांचा हा दिलासा
ना कुठला आकार, ना उकार
कलात्मकतेनी भरलेल्या हृदयाची ही असते पुकार
आनंदाचे ऊन कोवळे तर कधी काढते दुखाची सावली
रंग विरहाचा तर कधी मिलनाचा
सप्तरंगी कमान जणू ही लावली
शब्दांच्या बंधनात फुलते शब्दांचीही रांगोळी
मुक्तछंदातल्या रंगामध्ये सहज शब्दांना सोडल
मनाच्या अंगणात शब्द खूप सजतात, नटतात, मुक्तपणे बागडतात
निःशब्द स्पंदनात जणू नात्यांच्या वेली आनंदाने डोलतात
अशी शब्दांची रांगोळी प्रत्येकाने सजवावी
अर्थपूर्ण रंग भरून मग नित्यांतरी जोपासावी
कधी सुविचारांनी त्या शब्दांची शोभा वाढवावी
छटा भरून त्यात अक्षरांची शब्दार्थाची जोडणी करावी मनाच्या गाभार्यातून कधीतरी
शब्दांची रांगोळी रेखाटावी
