शब्द
शब्द
शब्द अलंकार असती
ताकद माझ्या मनगटाची
हाती लेखणी पडता
ऊर्जा येई लिहिण्याची
शब्द वाढवती बळ
वाचनाची आवड असता
साहित्य जपते संस्कृती
सदैव सहवास असता
शब्द फुलवती मळे
बहरून जाते जीवन
उजाड माळावरले सुद्धा
फूलून येते तन
शब्दांची संगत असावी सदा
वाढे आयुष्याचे मोजमाप
शब्दांच्या संगतीत जाती
विसरून सारे ताप
