STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract

3  

VINAYAK PATIL

Abstract

शब्द

शब्द

1 min
291

कसे बोलावे, कसे चालावे सारे शिकविले शब्दांनी 

कसे घडावे कसे बिघडावे याचा अर्थ ही सांगितला शब्दांनी 


शब्द म्हणता-म्हणता शब्दांचे झाले वाक्य 

वाक्य वाक्य रचूनी निर्मिले सुंदर काव्य 

काव्यातून निर्माण झाल्या अनेक पंक्ती 

यातूनच जन्माला आली काव्य भक्ती 


शब्दातूनचं येती शब्दांच्या अनेक जाती

बघता बघता तयार झाली अनेक नातीगोती 

शब्दातून तयार झाले एकवचन 

त्यातून निर्माण झाले मग बहुवचन 


शब्दाला आधार शब्दाचा 

शब्दांनी मांडला खेळ साऱ्या जीवनाचा

शब्दांनी सावरले शब्दांनीच पाडले 

असे कसे हे शब्द ज्यांनी सारे आयुष्य घडविले 

असे कसे शब्द ज्यांनी सारे आयुष्य घडविले 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract