शब्द पसार झाले
शब्द पसार झाले
पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चांदणे न्हाऊन गेले
बोलावे वाटले तुज तेव्हा माझे शब्द पसार झाले..
सांगावे वाटते खूपदा स्वप्न माझे मनातले
बोलणे ओठावर येण्यापूर्वी शब्द पसार झाले..
तिची नि माझी मैत्री आता लपून ना राहिले
ब्र कुणी बोलेना त्यांचेही शब्द पसार झाले...
गर्दीत बोलण्याचा कधी धाडस नाही केले
डोळेच बोलले दोघांचेही शब्द पसार झाले...
न बोलता ही मला तिचे प्रेमळ मन कळाले
आता काळजी नाही जरी शब्द पसार झाले...

