STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

3  

Shital Yadav

Inspirational

शब्द महिमा

शब्द महिमा

1 min
14.1K


ओसंडतो शब्दझरा

ठाव मनाचा घेऊनी

जन्म घेई नवकाव्य

दिशा नवख्या देऊनी


खूण रित्या अस्तित्वाची

शोध घेई अंधारात

कक्षा दिसे जीवनाची

गूढ शब्दांच्या गर्भात


वाट रम्य साहित्याची

शब्द गुंफिते आभाळ

वळणांची गोड स्मृती

जशी शांत सायंकाळ


शब्दसाज कवितेचा

अलौकिक अलंकार

शब्दरुपी आत्मीयता

नसे ममतेला पार


भाव मुके शब्दांविण

वेदनांना नाही अंत

शब्द सोबती जन्माचे

ठेवी विचार जिवंत


यातनांचे घनघोर

येवो कितीही वादळ

शब्दसंजीवन देई

आम्हां जगण्याचे बळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational