STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

शांत सावली आहे

शांत सावली आहे

1 min
337

तुझ्या शहरात आताशी 

खुपच अशांती माजली आहे

परंतु, माझ्या त्या जुन्या गावी

तशी पण शांत सावली आहे...


कधी दुःखे मिळाली इथे 

बहू माजलेली हृदयी रूळली  

खरी जिंकूनही पैजा 

कशी इथे मी आहे हरलेली...


कुणाला हाक मारली नाही

आहे तरी ताठ किनाऱ्यावर 

व्यथेच्या तळाशी मी ठाम उभी

कपटींच्या कधी नव्हती मी मार्गावर...


कधी जाणीव होतसे दु:खाची 

कधी संशय घेरतसे असाध्य 

मनास नव्हती कधी माझी पर्वा

कारण सुख-दु:खाविना सर्व अप्राप्य...


दिसेना का कुठेही जगी 

कोणी असा माणुसकीला आहे

नवी दुनिया नव्या रंगात

आताशी फारच बदल झाला आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational