सहा मार्च
सहा मार्च
अकराव्या दिवसाची सुप्रभात....
अ नाकलनीय दीप प्रज्वलनाची
क सोटी विनाविघ्न पार पडली
रा त्रीच्या तेजस्वी तेजाने
व्या धी कोरोनाची दूर पळाली....!
दि व्यास पाहून व्याधी बिथरली
व ज्रमुठ एकीची पाहताच घाबरली
सा थीने देशवासीयांच्या वाटते
चिरडून आपोआप नष्ट झाली....
सु योग्य सुमंगल नियोजनाने
प्र तापी आघात चांगलाच झाला
भा ग्याचे सौभाग्यात रूपांतर होता
त डफडतच कोरोना यमसदनी गेला.....!
अवकाश सारे तेजाळले
उत्साही आनंदाला भरते आले
वाटते हीच स्वयंघोषित आणीबाणी
मिळवून देईन सुखी जीवनाचे अमृतपाणी....!
