STORYMIRROR

supriya hanwate

Abstract

3  

supriya hanwate

Abstract

सेमिस्टर क्लियर निघणार तरी कसे

सेमिस्टर क्लियर निघणार तरी कसे

1 min
212

कोरोनानं अजबच केले सारे, 

काॅलेज, महाविद्यालयाला लावले टाळे! 

वर्ग सारे रिकामे; आणि 

जिकडे तिकडे ऑनलाईन शिक्षणाचे वारे! 

रेगुलर काॅलेज करायचो ;

तेव्हा पास व्हायचो कसेबसे

आता ऑनलाईन सारे;

सेमिस्टर क्लियर निघणार तरी कसे? 

ऑनलाईन लेक्चरला विद्यार्थीच असतात जेमतेम;

 नेट प्रॉब्लेम कारण सर्वांचीच सेम! 

कधी कधी लेक्चरची लिंक ओपन होत नाही;

झालीच तर सर आवाज आम्हाला;

 अन् आमचा सरांना जात नाही! 

ऑडियो, व्हिडीयो म्युट ;अबोल वर्ग सारा 

सारे झाले अवघड असे...! 

सांगा आता, सेमिस्टर क्लियर निघणार तरी कसे? 

झुम, गुगल मिटमुळे वर्गातली खरी मजा निघून गेली! 

सर आणि विद्यार्थींमधील संवाद ही मोजकाच, 

कारण या एपमुळे वेळ्चीही मर्यादा आली! 

यंदाचे शैक्षणिक वर्ष जरा अवघडच दिसे! 

कळेना खरंच ;

सेमिस्टर क्लियर निघणार तरी कसे? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract