STORYMIRROR

supriya hanwate

Others

3  

supriya hanwate

Others

ती म्हणे तुझ्या स्वप्नात येते

ती म्हणे तुझ्या स्वप्नात येते

1 min
186

ती म्हणे तुझ्या स्वप्नात येते! 

ती म्हणे नेहमीच तुझ्या स्वप्नात येते ? 

तुझी स्वप्न, सुखाची झोप सारं काही नेते! 


आज तुला नीट झोप लागत नाही. 

तिच्या फोटो शिवाय, तू दुसरं काहीच बघत नाही. 

हल्ली तुझं कामात ही लक्ष्य नसतं. 

मन तिच्या विचारातच रमलेलं असतं! 

चालता चालता आज तुझा तोल जातो, 

दिवसांतून दोनदा तरी तू धडपडतो! 

एका दिवसाची गोष्टच नाही, 

असं म्हणे तुझ्यासोबत नेहमीच होते! 

खरंच का? ती म्हणे तुझ्या स्वप्नात येते! 


अश्यानं भाऊ कसं चालायचं? 

आयुष्य तुझं कसं मार्गी लागायचं? 

अश्यानेच बघं प्रगती तुझी मागे राहते! 

खरंच का, ती म्हणे तुझ्या स्वप्नात येते..! 


Rate this content
Log in