कोरोनानं सार अजबच करुन ठेवलं.!
कोरोनानं सार अजबच करुन ठेवलं.!
शाळा, काॅलेज सारं काही बंद झालं!
प्रत्येक दुकानाला ही कुलुप लागलं!
कोरोनानं सार अजबच करुन ठेवलं!
आधी वाटलं चला, बरं आहे ;
सारे एकञ घराला तरी घर पण आलं!
पण, आर्थिक चणचण; घराघरात भांडण लागलं!
शाळेतही किलबिलाट नाही ;
काॅलेज तर सुनसुन लागु झालं!
कोरोनानं सार अजबच करुन ठेवलं!
हाताला काम मिळेना; पदरी सारी निराशा
दोन वेळेच जेवण नाही पोटाला,
अशी मजुर कामकर्याची दशा!
गरीबांच्या डोळ्यात असं पाणी दाटून आलं!
जणु जीवनच सारं उधळून गेलं.....
कोरोनानं सार अजबच करुन ठेवलं...!
