सैनिक
सैनिक
...सैनिक असतो नेहमी एक
"सैनिक" नसते कुठलीच जात
प्राणाहुनही प्रिय मातृभुमी
जुळलेले तिच्याशी अतुट नातं...
...टिपण्यास शत्रुची हालचाल
चालते सीमेवरती रातदिन गस्त
विसरुन रखरखते ऊन, कडाक्याची
थंडी आम्ही सदा कर्तव्यात व्यस्त...
...घरापासून राहतो
कित्येक किलोमीटर दूर
कधी आठवणींनी त्याच्या
भरून येतो आमचा उर...
...दिसताच तिरंगा समोर
मग तर फुटते स्फुरण
संपवणार शत्रुंना नाही
तर येईल शहिदाचे मरण...
...असतो जेव्हा चढवलेला
अंगावर सैनिकाचा वेश
तेव्हा विसरुन सर्वकाही
आधी दिसतो माझा देश...
