STORYMIRROR

Avinash Thakur

Inspirational

3  

Avinash Thakur

Inspirational

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

1 min
181


त्रिवार अभिवादन सावित्रीबाईंना

 ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोविला

धन्य झाली ही भारतभूमी

जिच्यामुळे आज देश उभा राहिला..||१||


अभिमान तुझा आम्हासी

शतकोशतकी वाटत आला,

तुझ्या कर्तृत्वाला कसलीही तोड

नाही या जगी आजही कोणाला..||२||


अज्ञान, जातीपातीच्या किर्र

आंधरात पेटली एक ज्ञानज्योती,

तिने सोसून घाव रुढी परंपरेचे

तेवत राहिली अखंड क्रांतिज्योती...||३||


माय बहिणीच्या शिक्षणासाठी

प्रयास केला तुम्ही भारी,

राखेतून विश्व उभे करण्याची

किमया होती तुमची खूप न्यारी....||४||


प्लेगच्या साथीत रोग्याची सेवा

 करता दिली प्राणाची आहुती,

अशा सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाची

वर्णावी आम्ही किती ही महती...||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational