कविता :- बैल पोळा
कविता :- बैल पोळा

1 min

71
सण बैल पोळ्याचा
माझ्या सर्ज्या राजाचा,
घरो घरी मान त्याला
अभिमान अवघ्या
महाराष्ट्राचा....
मान त्याचा आज खास
त्याला सजवू झकास,
रंग, फुग्यने सजवू त्याला
स्नान घालू आज खास...
पायी घुंगरू घालू
शिंगे रंगाने रंगवू,
झुल नक्षीदार त्याच्या
पाठीवर चढवू...
गळी घंटनी घालून
त्याला गावात मिरवू,
ओवाळूनी त्याला घास
पुरणपोळी भरवू....