आकाश
आकाश


निरभ्र आकाशात विहार
करती पाखरं,
मन त्यांचे निरागस
पाहा ही धरतीची लेकरं..
उडती गाती आकाशात
मिळून संग थवा,
मी पण पक्षी हवा
मनास वाटे हेवा..
नको इतरांचा हेवा
नको कोणाचा त्रागा,
आपण आपले जीवन
हवे तसे मनसोक्त जगा....
आकाश माझे घर
निसर्ग माझा सोबती,
घेऊन स्वप्न उराशी
करू विहार जगती...