STORYMIRROR

Avinash Thakur

Others

4  

Avinash Thakur

Others

भाऊबीज...

भाऊबीज...

1 min
497

नाते भाऊ बहिणीचे

सदा फुलत रहावे

साऱ्या भगिनींना तुम्ही

एका दृष्टीने पहावे...१


नको मला ओवाळणी

हाक माझी ऐक आज,

माय बहिणीची सदा

वाचवत जावी लाज...२


जिथे दिसेल अबला

तेथे मदतीला धाव,

वाचवून लाज तिची

झेल अंगावर घाव...३


नाक्या नाक्यावर उभे

कुत्रे वासनेचे भारी,

तुझ्या सारखेच भाऊ

हेच संकटात तारी..४


जप वारसा राजांचा

हीच भाऊबीज भेट,

धाड यमसदनासी

क्रूर दानवांना थेट..५


साहित्याला गुण द्या
लॉग इन