STORYMIRROR

Vimal Patkari

Romance

4  

Vimal Patkari

Romance

साथ तुझी माझी

साथ तुझी माझी

1 min
233

उतरत्या वयाची वाट मावळतीची

जोडीनं चालू या हात हाती घेऊनी 

अस्ताला जाणाऱ्या सूर्याला ध्यानी - मनी घेवुनी !!


जीवनाच्या संध्याकाळी असता तू माझ्या जवळी 

आठवते रे आजही प्रितीची पहिली रंग होळी

रंगात प्रितीच्या दंग होउनी!! जोडीनं जावू या!!


लावता थरथरल्या हातानं टिळा माझ्या कपाळी 

तुझ्या बोटाचा स्पर्श देई आजही प्रेमाची ग्वाही 

प्रेमाच्या सरीत चिंब भिजुनी!! जोडीनं चालू!!


राया, लावता मेहंदी तुझ्या नावाची हातावरी

रंगलेली मेहंदी मनाला प्रितीची गुदगुली करी 

प्रेमळशा गुदगुलीनं जीनं जगुनी!!जोडीनं चालू या!!


कानांनी माझ्या गं ऐकू ना येई काही जरी

भाषा तव प्रेमाची सखे गं मला कळे बघ तरी 

डोळ्यात तुझं सौंदर्य साठवूनी !! जोडीनं चालू या!!


आयुष्याच्या संध्येला जरी आला असला थकवा 

ठेवू रे तरुण तरीही आपण आपल्या मनाला

मनाचा पिसारा प्रितीनं फुलवुनी !!जोडीनं चालू या!!


मुलगा-सून, मुलगी-जावई, नात-नातू मायेची

पण तुझी-माझी साथ आहे जन्मांतरीची

प्रेमळ, अतूट साथ संगत घेऊनी !!जोडीनं चालू या!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance