सांज नित्य तळ्याकाठी
सांज नित्य तळ्याकाठी
भाव होते नयनी शब्द गुंतले ओठी
निरागस ती पहाट अबोल जीवनी
परतुनी ना भेटलीस या क्षितिजा
ओळखीच भान ते उसने नशिबाला
आवर्तन पुन्हा मागशील काहुनी
आयूष्यात वळणे तशी कमी पहिली
येशील का त्या वळणावर परतुनी
निरागस भाव पुसती तुझ्या मना
काय कोणती कशास उरी या सल ती
बुजुनी गेल्या पाऊलखुणा उगा शोधती
क्षणिक घडीचे ठरली अंतरी उलाढाल मोठी
कातर काहुरली जराशी सांज नित्य तळ्याकाठी

