सांगणार आहे
सांगणार आहे
खात्री आहे पुन्हा भेटशील
नेहमी प्रमाणे गोड हसशील
काय झालंय का? आपुलकीने विचारशील
तेव्हा तुला सांगणार आहे
सार काही सांगणार आहे
आश्चर्याने मागे सारशील
तेव्हा कदाचित नाही म्हणशील
किंवा मला वेळ हवा अस म्हणशील
तुझा कोणताही निर्णय मला छळणार आहे
तरीही मनातली तगमग मी ढवळणार आहे
तुज्या प्रीतीचे वादळ पेलणार आहे
तुला सगळं सांगणार आहे

