सांगाल का कोणी गुरु काय असतो...
सांगाल का कोणी गुरु काय असतो...
फुलासारखा कोमल असतो,
हसत हसत जीवन समजावतो.
नदीप्रमाणे प्रवाही दिसतो,
वाऱ्याप्रमाणे धाडसी भासतो
अन् सांगेल का कुणी गुरू काय असतो ?
सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो.
मुंगी प्रमाणे उद्योगी असतो,
शिष्याला देव मानुन बसतो,
त्यांच्याच यशात आनंद शोधत बसतो.
अन् सांगाल का कोणी गुरु का असतो ?
साधू प्रमाणे निरपेक्ष दिसतो,
चंद्राप्रमाणे शीतल भासतो.
अन् विचार त्याचा नेक असतो,
चुकल्या माकल्यांचा आधार असतो
अन् सांगाल का कुणी गुरू काय असतो ?
कर्णाप्रमाणे उदार दिसतो,
अमृता होऊनही पवित्र भासतो.
झाडाप्रमाणे आत्मंयदाता असतो,
तर सागराप्रमाणे गंभीर दिसतो.
अन् सांगाल का कोणी गुरु काय असतो ?
