STORYMIRROR

Vijay Shinde

Inspirational

3  

Vijay Shinde

Inspirational

राबणारा बाप माझा

राबणारा बाप माझा

1 min
354

राबणारा बाप माझा घाम तिथं गाळतो

माझियासाठी अन् जीव वेडा जाळतो...

 तहान नाही भूक नाही ,

सुख काय माहित नाही.

कष्ट हाच धर्म त्याचा ,

मौज काय मजा काय

कळण्याचा मार्ग नाही.


धरपड जीवनाची कष्ट सारे घामाचे

आस नाही, आराम नाही

फिरनं काय, माहित नाही

पुजा काय मंदिर काय कष्टच त्याचे


 सुख नाही शांती नाही,

तरी कष्टा वाचून दिस नाही

ज्ञान नाही श्रद्धा नाही,

कष्ट करण्याची उमेद त्याची


 पाण्यातला मासा तसा, घामातला बाप

नवीन काय अजून हे काय ,नाही त्याचा थाट

उमेद त्याची जगा वेगळी ,हारवून टाकील सारे घाट

मंजील त्याचे इतके उंच की, मनास भासे आस्मान जणू हे 

 सोसून कष्ट मनास बोले

नको रे बाबा हे पर पिढी

कुणास ठाऊक हे उद्याचे

अंधारातून प्रकाशात उजळून काढू

  स्वप्न माझं हे जगावेगळे

हरवून गेलो मी त्यात,

पाहून दृश्य हे सृष्टीचे

  मन माझे कळवळे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational