STORYMIRROR

Vijay Shinde

Inspirational

3  

Vijay Shinde

Inspirational

बाप माझा कधी जगलाच नाही

बाप माझा कधी जगलाच नाही

1 min
486

बाबा तू कधी स्व:तासाठी कधी जगलाच नाही

माझ्या स्वप्नाची ईमारत बांधताना

तुझ्या स्वप्नानांचा मनोरा माञ,

कसा अर्ध्यावरच राहीला...


माझी जुळवणी करता करता 

तु कधी मला जोडलाच नाही,

आन् काय सांगु बाबा 

तू स्व:तासाठी कधी जगलाच नाही

अन् कसं सांगु तुला की तु स्व:तासाठी कधी जगलाच नाही


आमच्या सारखाच लावलास जीव तू,

मुख्या गुरांना अन् डोलणा-या पिकांना

करता करता आमचं सगळ्यांच

तुझं काळीजच कसं करपून गेलं

अन् कसं सांगू तुला की, तु स्व:तासाठी कधी जगलाच नाही


खरं सांगायच बाबा तर,

गरीबीची कळ अन् उन्हाची झळ

माझ्यावर कधीच पडू दिली नाही,

पण् स्वत: माञ आगीत होरपळून गेलास

अन् कसं सांगु तुला की तु स्व:तासाठी कधी जगलाच नाही


कसं जमत तुला मला कधी कळलच नाही

मी काहीही मागितलं तरी

नाही म्हणन् तुला कधी जमलचं नाही

तरी मला सगळं पुरवलस भारी,

सोडुन सगळं बाजूला मोकळया आकाशात बघ

आता तरी बाबा तू स्व:ता साठी जग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational