सखे,असावीस तू नजरेत माझ्या
सखे,असावीस तू नजरेत माझ्या
तुझ्या माझ्या अंगावर पडावा अक्षदा साऱ्या जगाचा
नभीतल्या चांदण्यात दिसावी तुझीच मूर्त,
प्रीत गीत गुणगुणताना मिळालीस तू सुरेख देखणी
आयुष्याचे कोडे सोडवताना उत्तर बनवून तू यावेसे तूर्त
शहाणपणाचे शिकवून ज्ञान प्रेमालाच तू करतेस महान
कधीकधी वाळवंटात लागते मला जणू प्रेमाचीच तहान,
कितीही रागावलीस तरी घेवूनीया शाहळे तूच होतेस लहान
युगायुगीचे हे ऋणानुबंध वाढवून करूया प्रेमालाच महान
कधी लाजतेस जरी तू, शोभतेस लंकेची पार्वती
पाहून तुझी ही नजर भासतेस जणू अष्टभुजा तू महिषासुरमर्दिनी
बनुनी सरस्वती होतीस ज्ञानाची सारथी
ठेवून मनात हर्षाला शोभतेस संतोषी नावाला
तुझ्या आठवणीने मी, सखे पर कोलमडून गेलो
मिठीत घेता तुला मी स्वर्ग सुख ल्याहलो
उधळण गंधाची सखे तुझ्या नजरेत भासली
लाजवत मनाला माझ्या, तुझ्या ओठातून कळी खुलली
घेऊन आशीर्वाद करूया नवी सुरुवात
नवचैतन्याच्या ह्या नवदिवशी
असावीस तू नजरेत माझ्या
काळजात घर करून राहताना...

