एक शिवाजी घडवूया
एक शिवाजी घडवूया
माप ओलांडून सासरचं परक्या घरात आलीस
नवी माणसे जोडता जोडता ज्ञानही थोडं वाढवुया,
तू माझ्या साठी आणि मी तुझ्या साठी एक होऊन राहू
तुझ्या माझ्या मिलनातून एक शिवाजी घडवूया
पोरालाही शिकव त्याच्या पाठीशी जाऊन राहा
नवविचार घेता-घेता संस्कृती ही वाढवूया,
चारित्र्याचे शिक्षण देऊन खंबीर त्याला करूया
तुझ्या माझ्या मिलनातून एक शिवाची घडवूया
जगेल तो शकेल तो वाकेल ही तो तू फक्त खंबीर राहा
महाराजांच बाळकडू पाजून तयार त्याला करूया
आयुष्य जगता जगता आपलं एक हिरा घडवूया
तुझ्या माझ्या मनातून एक शिवाजी घडवूया
ज्ञानाचा पंडित कर त्याला गाणीमांचा कैवारी
नम्रता सहनशीलता त्याच्या अंगी पेरूया,
या महाराष्ट्राच्या माती साठी रक्त ही आपण सांडू या
तुझ्या माझ्या मिलनातून एक शिवाजी करूया
आता जन्म घेतील तुझ्या पोटी सारेच महामानव येते
शाहू फुले आंबेडकर या मातीत पून्हा रुजवूया,
एकदा या महाराष्ट्राच्या पवित्र माती साठी
तुझ्या माझ्या मिलनातून एक शिवाजी घडवूया...

