STORYMIRROR

Vijay Shinde

Inspirational

3  

Vijay Shinde

Inspirational

जाणीव मायेची

जाणीव मायेची

1 min
176

जगवलस मला प्रेमाचा अमृत देऊन

वाढवलस मला तु ज्ञानाचं भांडार देऊन

 सांग ना आई का गेलीस आज

इथे मला एक ठेवून


जपलस मला जीवापाड तू मला

ठेवली नाहीस कसलीही उणीव

 जग फिरताना आज मला

 कायम होते तुझीच जाणीव


 दुःख काय असतं ते

 तू माझ्याजवळ येऊ दिलं नाहीस

 काय सांगू या जगाला

 तू माझ्यासाठी काय काय केलं नाहीस


 तापामध्ये माझ्या आई

रात्र रात्र जागली तू

वाढवण्यासाठी मला

तू कायम खंबीर राहिलीस


 डोळ्यांमध्ये तुझ्या दिसते निरंजनी वात

 असं काय आहे तुझ्यामधी

 कुशीमधी शिरता तुझ्या

 अजूनच घट्ट होतं नात


 मायाळू ग नजर तुझी

 लय सांगून जाते

तुझ्याबद्दल लिहिताना माई

माझ्या डोळ्यात पाणी येते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational