STORYMIRROR

Neeraj Shelke

Romance

4  

Neeraj Shelke

Romance

सांग तूच...

सांग तूच...

1 min
185

सांग तूच,सखे मज

तुजसाठी काय लिहू ,

देवांच्या नैवद्यासम

लेखणीस तुज वाहू !!


उधळू रंग प्रेमाचे 

की आणिक करू काही,

तुजवर काव्य करण्या 

लेखणीत भरू श्याही !!


लिहिताना गोड शब्द

भाव भाव साठवून ,

प्रेमाचे गीत आपुले

मी लिहीन आठवून !!


नको ठेवूस अंतर

अन् नको तो दुरावा,

शब्द माझे वाचुनी तु

प्रेम अंतरी भरावा !!


तूच माझे शब्द असे

तूच असे लेखणीही ,

तुझ्यासम अप्सरा गं

नसे कुणी देखणीही !!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance