सांग प्रिया
सांग प्रिया
भुरळ मनाला अशी तुझी तू असता काय उणे, सांग प्रिया.........
सांग प्रिया, तुजवीन का वाटे जग हे सुने सुने
सहज पाहिल्या वाटेवर तव
आठवणींच्या खुणा
प्रत्येक खुणेच्या जवळ मी जाता
हर्ष जाहला मना
कुणी म्हणे मजला जे लागे
वेड असे हे जुने
सांग प्रिया, तुजवीन का वाटे जग हे सुने सुने ओंजळ भरली फुलाफुलांनी
तरीही न आली मना
एक फूल तू कधी दिलेले
जपते पुन्हा पुन्हा
आज निघाले ठरवून तुजला सांगीन या हेतूने
सांग प्रिया........
सांग प्रिया तुजवीन का वाटे जग हे सुने सुने

