Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Ashvini Dhat

Tragedy

3  

Ashvini Dhat

Tragedy

सांग आता आम्ही

सांग आता आम्ही

1 min
7.1K


सांग आता आम्ही

जगायचं का नायं?


पावसा तू घेतलास

काढता पाय

सांग आता आम्ही

पेरणी करायची का नाय?


बरसलास तू असा

कुठे आला पूर

तर कुठे नुसतीचं भुरभुर


सतत चालतो तुझा

उन पावसाचा खेळ

मग येते शेतकऱ्यावर

आत्महत्येची वेळ


सांग आता आम्ही

कसं जगायचं

कर्ज तरी आम्ही

कोणाकडे मागायचं?



सतत आमच्या कपाळावरती

शिक्का कर्जबाजारी

तुझ्या अशा वागण्याने

सतत शेतीव्यवस्था आजारी


पाण्याचा प्रश्न

होऊ लागलायं बिकट

अनेक जीव जातील

मानवा सकट


प्रत्येक सरकार येतं

हमी देऊन जातं

कुणाचचं नाही रे

आमच्याशी रक्ताचं नातं


आहे महागाई म्हणून

आम्ही थोडक्यात भागवतो

आमच्या मुला-बाळांनासुध्दा

गरिबीत जगवतो


आमच्या नावासमोर

विशेषण गरीब शेतकरी

सतत घाम गाळून

शेतात कष्ट करी


म्हणून तुला तरी

येऊ दे कीव

पुढच्या वर्षी तरी बरसून

टाक आमच्या आयुष्यातं नीव


Rate this content
Log in