साई महिमा
साई महिमा
वर्णू मी काय महिमा साईंची
होते गाळण येथे पापाची
करावी आरती बाबांची
शिकवण श्रद्धा सबुरीची
फकीरा परी जगे
तरी रूप हे साजरे
शिकवण प्रेमाची
धरुनी या कास भक्तीची
माझ्या साईंच्या हातात
आहे फार मोठी जादू
पाण्याचे दिवे लावून
दिवाळी साजरी करे
केला कित्येकांचा उद्धार
होऊनिया स्वतः आई
लेकरास घास भरवे
प्रत्येकाला जपे हो साई.
सांगे जात-पात खोटी
माणुसकीच आहे मोठी
साई महिमा वर्णावया
कविता माझी छोटी.
